नवी दिल्ली:काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज वैध ठरवत राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. अमेठीमधील अपक्ष उमेदवार ध्रुवलालने राहुल गांधी भारतीय नसल्याचे कारण देत तक्रार दाखल केली होती. ध्रुवलाल यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आज त्यावर सुनावणी झाली. यामध्ये राहुल गांधींच्या वकिलाने बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर निवडणुक आयोगानं राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे.