‘राहुल गांधींना पंतप्रधान झालेलं पाहायचंय’ : सुधीर कुलकर्णी 

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरचा प्रश्‍न सोडवू शकले नाहीत. त्यामुळे काश्मीर प्रश्‍न सोडवू शकणार्‍या नेत्याची या देशाला गरज आहे. त्यामुळेच भविष्यात राहुल गांधी यांना पंतप्रधान झालेले पहायाचे आहे,’ असे  भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सुधींद्र कुलकर्णी यांनी हे विधान केले. देशातील मोठ्या समस्यांना सोडविण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरले असल्याचे कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले. चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधताना कुलकर्णी यांनी हे विधान केलं. तर मोठ्या मनाचा नेता, म्हणत राहुल गांधी यांच्यावर त्यांनी स्तुतीसुमने उधळली. दरम्यान, यापूर्वीही कुलकर्णी यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सडकून टीका केली होती. मोदींच्या पंतप्रधान होण्यालाही त्यांनी 2014 मध्ये विरोध केला होता.