राहुल गांधींना मोठे ‘गिफ्ट’; आजच्या दिवशीच बनले होते कॉंग्रेस अध्यक्ष !

0

नवी दिल्ली-आज पाच राज्यातील निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे. दरम्यान आजच्या दिवशीच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे कॉंग्रेसला आज मिळत असलेले यश राहुल गांधी यांच्यासाठी मोठे गिफ्ट मानले जात आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला यश येत असतांना दिसत आहे. राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वी आजच्या दिवशी कॉंग्रेसचे कमान स्वीकारले होते.