जयपूर : राहुल गांधींनी हिदूत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकवू नये असे विधान स्मृती इराणी यांनी केले आहे. राहुल गांधीनी अगोदर त्यांच्यामधील हिंदूत्व सिद्ध करावे आणि मग टीका करावी असा सल्लाही त्यांना दिला.राजस्थानमधील निवडणुकीत राजकीय पक्षांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून आरोप प्रत्यारोपाचे समिकरण बघायला मिळत आहे. यापूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही राहुल गांधींवर टीका केली होती.
स्मृती इराणी म्हणाल्या की, बघा कसे दिवस आले आहेत. जे राहुल गांधी हिंदूना दहशतवादी म्हणून संबोधत होते तेच आज हिंदूत्वावर विधान करतात. ते राहुल गांधी ज्यांना मध्यप्रदेश येथे त्यांचे गोत्र काय होते या बद्दल माहिती नव्हती. आज नरेंद्र मोदींना समजवणार की हिंदूत्वाची व्याख्या काय आहे. राहुल गांधींनी घेतलेल्या सभेत लोकांची गर्दी नव्हती. त्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी विधान केले. असे स्मृती इराणी म्हणाल्या.