नवी दिल्ली: वाराणसीतून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतील अशी चर्चा सुरु आहे. याबाबत प्रियांका गांधी यांना विचारण्यात आले असता त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी परवानगी दिल्यास मी वारानासीतून निवडणूक लढवेन, वाराणसीतून लढतांना मला आनंदच होईल असे सांगितले. आज प्रियांका गांधी केरळमधील वायनाड येथे प्रचारासाठी गेल्या आहेत.
कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना राजकारणात आणून नवा डाव खेळला आहे. प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे.