राहुल गांधीच्या प्रगतीपत्रात मोदी सरकार नापास

0

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपच्या ४ वर्षांचे प्रगती पत्रक तयार केले आहे. या प्रगतीपत्रकात त्यांनी पंतप्रधान मोदींना नापास दर्शवून “एकाग्रतेची कमतरता असलेले निष्णात संवादक” असा शेरा दिला आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना शेती, परराष्ट्र धोरण, इंधनांच्या किंमती, रोजगार निर्मिती या विषयांमध्ये नापास दर्शवले असून घोषणा निर्मिती व स्वतःचा प्रचार यामध्ये त्यांना ‘अ’ श्रेणी दिली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर असे लिहिले आहे.