राहुल गांधीनी ‘कोरोना विषाणूची’ तपासणी केली का? भाजपा खासदार

0

नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी नुकतेच इटली दौऱ्यावरून भारत देशात परत आले आहे. काल त्यांनी दिल्लीतील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यावरून भाजपा नेते खासदार रमेश बिधुडी यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. राहू गांधी यांनी इटली दौऱ्यावरून परत आल्यानंतर आपली तपासणी केली की नाही? हे स्पष्ट करण्याचे सांगित राहुल यान च्या इटली दौऱ्याचा संबंध कोरोना सोबत जोडून टाकला.

‘कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे राहुल गांधींनी लोकांपर्यंत जाण्या अगोदर स्वत:ची वैद्यकीय चाचणी करायला हवी होती’ असे बिधुडी यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी दंगलग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. ही शाळा हिंदुस्तानचं भविष्य आहे. इथं द्वेष आणि हिंसेमुळे हे भविष्य धोक्यात आहे. यामुळे कुणाचाच फायदा होणार नसल्याचे म्हटले होते.

भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी दिल्ली हिंसाचारावर बोलण्याऐवजी राहुल गांधींना निशाण्यावर घेतले. ‘राहुल गांधी नुकतेच इटलीहून परतलेत. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी झाली की नाही, हे मला माहीत नाही. परंतु, त्यांनी लोकांध्ये जाण्यापूर्वी हे सांगायला हवं की त्यांनी करोना व्हायरस चाचणी केली किंवा नाही. लोकांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे’.