राहुल गांधी अमेठी आणि केरळमधून लढणार !

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी निश्चिती झाली असून अनेक ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड अशा दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटनी यांनी आज दिली.

राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या. केरळ काँग्रेसने राहुल यांना तसा प्रस्तावही दिला होता. मात्र, त्यावर राहुल यांनी काहीच भाष्य केले नव्हते. परंतु, आज काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी राहुल गांधी अमेठीसह केरळमधूनही लढणार असल्याचे जाहीर केले. तर अमेठीशी गांधी कुटुंबाचे कौटुंबिक नाते आहे. अमेठीला राहुल त्यांची कर्मभूमी मानतात. त्यामुळे अमेठीपासून ते दूर होणे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी अमेठीसह केरळमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.