अजमेर- भाजपा प्रवक्ता आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत:ला काश्मिरी ब्राह्मण असल्याचे सांगितल्याने खोचक टीका केली आहे. शाहनवाज हुसैन यांनी राहुल गांधी कोणत्याही गोत्राचे असोत मात्र आम्हाला तर इतकेच माहित आहे की ते फिरोज गांधी यांचे वंशज आणि नातू आहेत. फिरोज गांधी काश्मिरी ब्राह्मण नव्हते अशी खोचक टीका केली आहे. काल राहुल गांधी राजस्थानमधील पुष्कर सरोवर येथे पूजेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी गोत्र आणि जातीबाबत खुलासा केला होता.
दरम्यान शहनवाज हुसैन यांनी वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांना निवडणूक आली की गोत्र, जात आठवते. हीच लोकं हिंदू आतंकवाद, भगवाआतंकवाद असे शब्द प्रयोग करून वातावरण गढूळ करतात असे आरोपही हुसैन यांनी केले आहे.
संबंधित बातमी वाचा-पहिल्यांदाच समोर आले राहुल गांधी यांचे गोत्र; या जातीशी आहे संबंध