नवी दिल्ली-देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. यातच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अचानक मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करू लागले असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. राहुल गांधी यांनी स्वत:ला शिवभक्त तसेच हिंदू प्रेमी असल्याचे सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस अध्यक्ष अशी भूमिका कशी घेऊ शकतात या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर आरोप होत आहे. भाजपला हा आयता कोलीत मिळाला आहे. कॉंग्रेसच्या अचानक जन्माला आलेल्या या मंदिर प्रेमाविषयी सगळेच अचंबित आहे. मात्र कॉंग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी याबाबत खुलासा केला आहे.
थरूर यांनी सांगितले आहे की, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हृदयात धार्मिक भावना आहे. मात्र कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याने कधी-कधी त्याचे जाहीर प्रदर्शन करता येत नाही. परंतू सार्वजनिक जनभावना बघता भावना व्यक्त केली जाते.
राहुल गांधी हे याच मुद्द्यावर चालत आहे. मात्र विरोधक त्याला फक्त राजकीय दृष्टीने बघत आहे. विरोधकांनी राजकीय विचार बदलावे असा टोला थरूर यांनी लगावला आहे.