नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर कॉंग्रेसमध्ये शांतता पाहायला मिळत आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देखील दिला. मात्र त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी राहुल गांधी पोहोचले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूक आणि आता येत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे.