राहुल द्रविडच युवासंघाचा प्रशिक्षक बनण्याचे संकेत?

0

मुंबई । भारतीय संघाची वॉल म्हणजे राहुल द्रविड याच्यावर युवा क्रिकेटची जबाबदारी देण्यात आली होती.हा करार मार्च मध्ये संपुष्टात आला आहे. पुन्हा नव्याने द्रविडच्याच खांद्यावर युवा क्रिकेटांची जबाबदारी टाकण्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. द्रविड याच्या बरोबर बीसीसीआयने करार केलेल्या करारामध्ये प्रशिक्षक पदाचा कालावधी वाढवून दिला जावू शकतो अशी अट टाकण्यात आली होती.याचबरोबर बीसीसीआयच्या नविन नियमानुसार,राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकांना यापुढे दोन वर्षाचा कालावधी राहणार आहे.याकाळात त्यांना आयपीएल संघाचे प्रशिक्षकपद सांभाळता येणार नाही. येत्या वर्षापासून द्रविडला बीसीसीआयने प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीकरता स्थापन केलेल्या क्रिकेट अ‍ॅडवायजरी कमिटीने याआधीच द्रविडच्या नावाला आपली पसंती दिली आहे. द्रविडसोबत सर्व आर्थिक बाबी नक्की झाल्यानंतर समिती आपली अधिकृत मोहर उमटवणार असल्याचे समजतेय. जुलै महिन्यात भारताचा 19 वर्षाखालचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. जिथे संघ 2 कसोटी आणि 5 वन-डे सामने खेळणार आहे.युवा संघ उभारण्यात द्रविडचा मोठा वाटा आहे. तरुण खेळाडूंची कामगिरी पाहता द्रविड पुन्हा संघाचा प्रशिक्षक म्हणून येणे ही नक्कीच आशादायी गोष्ट आहे.