जळगाव । कथालेखक राहुल निकम यांनी लिहिलेला ‘बिजवाई’ कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील माधव मदाने पुरस्कृत शरच्चंद्र चिरमुले पुरस्कार उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून जाहीर झाला आहे. 26 मे रोजी मसापच्या वर्धापदनदिनी मा. वैदेही (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कन्नड लेखिका) यांच्याहस्ते तर डॉ. रावसाहेब कसबे यांच्याअध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. ‘बिजवाई’ कथासंग्रहास या अगोदर अस्मितादर्श उत्कृष्ट वाड्:मय पुरस्कार मिळालेला आहे.