राहुल, प्रियांका गांधींना आंदोलनात मृत कुटुंबियांच्या भेटीपासून रोखले !

0

मेरठ: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी कायदा संमत केला आहे. या कायद्याला देशभरात विरोध होत आहे. कायद्याच्या विरोधात आंदोलने होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. देशभरात १२ जणांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान आज मंगळवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मृत आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले होते. मात्र शहराबाहेरच त्यांना अडविण्यात आले. पोलिसांनी त्यांना शहराबाहेर रोखून गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राहुल आणि प्रियांका गांधी जात होते.

उत्तर प्रदेशात सीएए कायद्याविरोधात मोठे आंदोलन झाले. आंदोलनात हिंसाचार झाले. यात काही आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले होते. जखमी आणि मृत कुटुंबियांची भेट राहुल गांधी प्रियांका गांधी घेणार होते.