राहुल महाजनने बांधली तिसऱ्यांदा लग्नगाठ

0

मुंबई : नेते प्रमोद महाजन, यांचा सुपुत्र राहुल महाजन पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. २५ वर्षीय कझाकिस्तानी मॉडेल नत्याला इलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे. राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे. या सोहळ्यासाठी काही मोजकेच लोकांनी हजेरी लावली.

या आधी राहुल महाजननं वैमानिक श्वेता सिंग सोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून राहुलनं डिंपी गांगुलीशी लग्न केलं. लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिंपीने केली होती. लग्नानंतर पाच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. राहुलपासून विभक्त झाल्यानंतर डिंपीनं दुबईस्थित उद्योजक रोहित रॉय याच्याशी विवाह केला.