नवी दिल्ली : ‘आशिकी’फेम अभिनेता राहुल रॉयने शनिवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राहुलने नव्या इनिंगला सुरूवात केली. हा माझ्या आयुष्यातील एक विलक्षण दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ज्या पद्धतीने देशाला प्रगतिपथावर नेण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न केला आहे, हे खरेच वाखाणण्याजोगे आहे.
त्यांच्या योगदानामुळे जागतिक स्तरावर सर्वांचाच भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे, असे राहुल रॉय म्हणाला. राहुल रॉय बर्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्याने प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेला होता. राहुलला चित्रपटसृष्टीत यश मिळाले नाही. त्यामुळे बर्याच काळासाठी तो चित्रपटसृष्टीपासून दूर राहत होता.