जळगाव । राहूल गांधी यांची दिल्ली येथै भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 49 वे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होवून त्यांनी आज पदाची सुत्रे हाती घेतली. या निवडबद्दल जळगाव शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांतर्फे ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष केला. तसेच फटाके फोडून व पेढे वाटप करत आनंदोस्तव देखील साजरा केला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील,माजी शहर जिल्हाध्यक्ष अँड.सलीम पटेल, श्याम तायडे, सेवादलाचे राजस कोतवाल, जमील शेख, मनोज चौधरी, बाबा देशमुख, अमजद पठाण, तुळशीराम जाधव, विशाल पवार, दीपक सोनवणे,प्रदिप सोनवने, शशी तायडे, शोएब पटेल, जाकीर बागवान, ज्ञानेश्वर सोनवने, जगदिश गाडे, अय्याज शेख सुभाष ठाकरे, संजय राजपूत आदी