राहूल गांधींना देवांमध्ये दिसला काँग्रेसचा ‘हात’

0

– भाजपने आक्षेप नोंदवत केली तक्रार

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी नुकतेच शीव, गुरूनानक, बुद्ध,आणि महावीर यांच्या प्रतिमांमध्ये काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला ‘हात’ दिसत असल्याचे वक्तव्य भाजपला चांगलेल लागल्याचे दिसून येत आहे. या वक्तव्याच्या माध्यमातून राहूल गांधी यांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा केल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसने 11 जानेवारी रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या जनवेदना संमेलनात हे वादग्रस्त वक्तव्य केले होते, असा आरोप भाजपने केला आहे. हे वक्तव्य हे निवडणूक आचारसंहितेचेच उल्लंघन नाही तर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन केले असल्याचा भाजपचा दावा आहे.

काय होते वक्तव्य ?

राहुल गांधींनी 11 जानेवारी रोजी सायंकाळी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये जन वेदना सम्मेलनात भाषण केले होते. यात म्हणाले की, “मला माहिती होते की, काँग्रेस पार्टी 100 वर्ष जुनी आहे. एक दिवस मी फोटो पाहत होतो तर, मला शिवजींच्या म्हणजे शंकराच्या फोटोत काँग्रेसचे निवडणूक चिन्हं दिसले. बुद्धांचा फोटो पाहिला तर त्यातही काँग्रेसचे चिन्हं, महावीलांच्या फोटोतही दिसले. मी करण सिंहांना विचारले सगळीकडे काँग्रेसचे चिन्हं पंजा का दिसत आहे. त्यावर ते म्हणाले, वर्तमान परिस्थितीत सत्याचा सामना करा. आपल्या अस्तित्वाला घाबरू नका. मी मित्रांना भेटलो आणि म्हणालो, घाबरू नका, काँग्रेसचा विचार सांगतो घाबरू नका. दुसरा एक विचार मात्र घाबरा आणि घाबरवा असे सांगतो. भाजपचे लक्ष्यच घाबरवणे हे आहे. दोन तीन महिन्यांत या लोकांनी संपूर्ण भारतात भिती पसरवली आहे. आम्ही म्हटले होते, 100 दिवसांची गॅरंटी देतो. आम्ही सांगितले तुमची जमीन तुमचीच राहील”