भुसावळ । येथील खडका रोड भागातील अक्सा कॉलनीमधील नगरसेवक हाजी जाकीर यांच्या पटांगणावर जमीअत अहले हदीसतर्फे एक दिवसीय ‘राहे हक’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मालेगाव येथील मौलाना शकील अहमद फैजी हे होते.
या परिषदेत प्रवक्ता शेख फजलूद रहमान मालेगाव यांनी उपस्थितांना अजमले सहावा या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, नबी सल्लेअलाहचे सोबती सर्व इस्लामी कामात नमुना असून तरीही आपण कुरआन व सुन्नत समजू शकत नाही.
महिलांच्या जबाबदारीवर मांडले विचार
मुंबई येथील शेख कमालुद्दीन यांनी मोहब्बते रसूल यांच्या विषयावर सांगितले की, अल्लाह व रसूल यांच्यावर कायम विश्वास ठेवून कामे केल्याशिवाय जीवनात मोक्ष मिळू शकत नाही. आदी विषयांवर तर मुंब्राचे मौलाना अजमल मुस्तफा मदनी यांनी इस्लाममध्ये महिलांचे स्थान व त्यांची जबाबदारी या विषयावर जोरदार विचार मांडले. शेवटी ईस्लाम व सहनशिलता या विषयावर मौलाना मोहम्मद मुकीम फैजी यांनीही विचार मांडले. या परिषदेस समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी अध्यक्ष निसार अहमद खान, सचिव नदीम अहमद, सदस्य डॉ. मोहसीन काशिफ, सोहेल हमीद खान, अल्ताफ खान, शाहनवाज खान, मिनाज शेख, रहीम खान आदिंनी परिश्रम घेतले.