जळगाव। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने माहिती तंत्रज्ञान सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भोकर ता.जळगाव येथील संदीप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेलचे उपाध्यक्ष या नात्याने पक्ष संघटनेसाठी माहिती तंत्रज्ञानाचे विविध उपक्रम उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये राबविण्याची प्रमुख जबाबदारीसह पाच जिल्ह्यांतील पक्षाच्या 10 जिल्हा संघटनांतील माहिती तंत्रज्ञान सेल कार्यान्वित करणे व प्रदेश माहिती तंत्रज्ञान सेलच्या आरआयएमएस या प्रणालीतून त्या-त्या जिल्हा संघटनेतील विविध पदाधिकारी, फ्रंटल, सेलच्या कार्यकारिणी व इतर माहिती संकलीत करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.