रा.काँ.च्या वर्धापन दिनानिमित्त शेकडो दात्यांचे रक्तदान

0

नंदुरबार:शहरात रा.काँ.चा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात 100 दात्यांनी रक्तदान केले. येथील गॅरामिल कम्पाऊंडमध्ये पक्षाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी सागर तांबोळी, एम.एस.गावित, हेमलता शितोडे, राजेंद्र पाटील, राजेंद्र बाविस्कर, डॉ.जगदिश पाटील, समाधान देसले, ज्ञानेश्‍वर ठाकरे, प्रकाश भिल, वामन पिंगळे, महेंद्र कुवर आदी उपस्थित होते. यानंतर शहरातील निलेश लॉन्स येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. कोविड-19 प्रादुर्भावामुळे गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असल्याने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करुन रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.