रा.काँ.च्या सामाजिक न्याय विभागाच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी संदीप हिवाळे

0

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी संदीप हिवाळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, अरविंद मानकरी, पक्षाचे नेते संजय गरुड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी किशोर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रल्हाद बोरसे, तालुका उपाध्यक्ष सोनू महाजन तसेच पदाधिकारी उपस्थित होते. याबद्दल तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवा तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, किरण पाटील, पुंडलिक पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, युवा शहराध्यक्ष विनोद माळी तसेच कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.