अमळनेर । येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ पैलाड भागातून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी टप्प्याटप्प्याने हे अभियान संपूर्ण शहर व ग्रामीण भागात राबवून तरुण राष्ट्रवादिसोबत जोडणार असा मनोदय व्यक्त केला. पैलाड परिसरातील शेकडो युवकांनीं यास प्रतिसाद देऊन स्वयंस्पुर्तीने नोंदणी केली,दरम्यान या कार्यक्रमानंतर ग्रामीण भागात डांगर बुदु्रक येथून सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला,तेथेही मोठा प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला. यावेळी नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने बराच वेळ हा कार्यक्रम सुरु होता. यामुळे बाहेरगावाहुन उपस्थित असलेल्या मान्यवरांनी समाधान व्यक्त करून राष्ट्रवादीची ताकद या तालुक्यात निश्चितच वाढत असल्याचा सूर काढला तर अनिल पाटील यांनी गाव व गल्ली तेथे राष्ट्रवादीची फौज असे चित्र या मतदार संघात निर्माण झालेले दिसेल असा विश्वास त्यांच्याजवळ व्यक्त केला.
राष्ट्रवादीची ताकद वाढविणार
पैलाड नाक्यावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा महानगर अध्यक्ष मिनल पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश पाटील, सरचिटणीस रिता बाविस्कर,शिवाजीराव पाटील, पं.स. सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील, सचिन बाळू पाटील यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग
संजय पाटील, रणजित पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, प्रा.सुरेश पाटील, विनोद कदम, अलका पवार, हिंमत पाटील, संजय पाटील, माजी सभापती सुभाष देसले, विजय पाटील, नगाव सरपंच महेश पाटील, डॉ.रामू पाटील, निखिल पाटील, गौरव उदय पाटील, गणेश पाटील, महेश कासार, देविदास देसले, संजय पाटील, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर देसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
डांगर बुद्रुक गावातही प्रतिसाद
ग्रामीण भागात भाजपा जिल्हाध्यक्ष व भाजपा आमदारांचे गाव असलेले डांगर बुद्रुक या गावातून सदस्य नोंदणीचा शुभारंभ अनिल भाईदास पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे सर्वांचे स्वागत करून राष्ट्रवादीचे फटके गळ्यात टाकले. तसेच इतरांसाठी सदस्य पुस्तिकेचेही वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आम्ही अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत कार्यरत राहून संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहू असा मानस व्यक्त केला. उमेश पाटील, सचिन बाळू पाटील, प्रा.सुरेश पाटील, रामकृष्ण पाटील, जानंव्याचे रावसाहेब पाटील यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्षांच्या गावात राष्ट्रवादीचे रोपटे लागल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.