रा.कॉ.सामाजिक न्याय विभाग अध्यक्षपदी विशाल शेजवळ

0

अमळनेर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्षपदी विशाल शेजवम6ळ यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विनोद निकम व कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे यांनी ही निवड करण्यात आली असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

निवडीचे पत्र माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, जे.डी.सी.सी.बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष विक्रांत पाटील,महिला तालुका अध्यक्षा योजना पाटील, सामाजिक न्याय विभाग शहाराध्यक्षा कल्पना अहिरे , अरविंद मानकरी,आनंद नरवाडे, बबलू नंनवरे, विनोद सपकाळे,पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.