रा.ध. कॉलेजात स्वागत समारंभ

0

पुणे । राजा धनराज गिरजी ज्युनियर कॉलेज व व्यावसायिक शिक्षण विभागातील इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. शिक्षणाला अनुभवाची जोड दिल्यास जीवनात यशस्वी होता येते. चांगल्या संगतीमुळे आयुष्य चांगले घडते, असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंदजी संचेती यांनी व्यक्त केले. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केल्यास जीवन यशस्वी होतेल, असे मत संस्थेचे सचिव वी. व्ही. जवळेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्रा. किशोर ओमासे यांनी, तर आभार रमेश इंगळे यांनी केले.