रा.स्व.संघातर्फे अखंड भारत संकल्प दिन

0

भुसावळ । राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अखंड भारत संकल्प दिन व रॅलीचे आयोजन अहिल्यादेवी कन्या विद्यालयात सोमवार, 14 रोजी सायंकाळी सहा वाजता निघणार आहे शिवाय रात्री आठ वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल. 14 ऑगस्ट 1947 रोजी भारत-पाकची फाळणी झाली. ही फाळणी म्हणजे 15 ऑगस्य 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यालाही काळीमा होती. या फाळणीमुळे पुन्हा एकदा आपली भारतमभुमी खंडीत झाली. सद्यस्थितीत काश्मिर व अरुणाचल प्रदेश वेगळा होण्याची वाट पाहतोय तसेच चीनचे कटकारस्थान व वैचारिक आक्रमण या विषयावर स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय प्रमुख सतीष कुमार हे मार्गदर्शन करतील. राष्ट्रप्रेमी युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.