चोपडा। चिनी वस्तुंच्या विक्रीविरुध्द रा.स्व.संघ 7 ते 21 जुलै दरम्यान जनजागृती करणार असल्याचे जिल्हा प्रचारक आत्माराम बावस्कर यांनी येथे सांगितले. यावेळी मंचावर जिल्हा संघचालक राजेश पाटील, शहर संघचालक डॅा.साळुंखे उपस्थित होते. भारताला व हिंदू धर्माला गुरु शिष्य नात्याची मोठी परंपरा आहे. तसेच गुरुसाठी समर्पण करण्याचा प्रशंसनीय इतिहास आहे.
चीनच्या दादागिरी थांबविण्यासाठी प्रत्येकाने विविध मार्गांनी जनजागृती करण्याचे आवाहन बावस्कर यांनी केले. गुरुपुजन सोहळ्यासाठी मुख्य शिक्षक नितीन महाले यांनी शाखा लावली. यावेळी कृष्णा महाजन, यशवंत मिस्तरी, महेंद्र शेटे यांनी पद्य सादर केली. अखेरीस चिंटू शेटे यांनी प्रार्थना सादर केली. यावेळी प्रा.पी.के.दलाल, श्रीकृष्ण टील्लू, भुपेंद्र गुजराथी, गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी, एकनाथ धोत्रे, अशोक सोमाणी, दीपक लोहाणा, लक्ष्मण शेटी, मुरलीधर पाटील, संदीप पाटील, अशोक धोबी, मनमोहन शर्मा, श्रीकांत नेवे, विजय जाधव, विजय भामरे, प्रशांत गुजराथी, मुरली गुजराथी, नरेंद्र विसपुते, शाम सोनार आदी उपस्थित होते.