मुंबई-‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘कागर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लवकरच ‘कागर’ चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्पावधीत या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे.
‘कागर’ चित्रपटाच्या टीझरमध्ये पुन्हा एकदा रिंकूचा सैराटमधील आर्चीचा बोलण्याचा बाज पाहायला मिळतो आहे. या टीझर पाहिल्यानंतर यातही प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. मात्र राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा गुंफण्यात आल्याचे जाणवते. तसेच तिच्या प्रियकराला मारहाण होते आणि रिंकू राजकारणात एन्ट्री करते, असे दाखवण्यात आले आहे. तिची प्रेमकथा पूर्ण होते की अपूर्ण राहते, हे चित्रपटातच समजेल.
‘सैराट’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लवकरच ‘कागर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्पावधीत या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे.