रिंगरोड बाधित लोकांच्या तीन दिवसांत 18 बैठका

0

पिंपरी-चिंचवड : रिंगरोड होवू नये यावर जनजागृतीसाठी रिंगरोड बाधित नागरिकंच्या तीन दिवसात तब्बल 18 मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. तसेच कारवाई केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा ठराव देखील ठिकठिकाणी मंजुर करण्यात आले आहेत. कारवाईबाबत प्राधीकरण प्रशासनाची भूमिका दुटप्पी असल्याचाही आरोप बैठकांमध्ये नागरिकांनी केला. पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोडबाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.

विविध ठिकाणी बैठका
संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर घर बचाव संघर्ष समितीने आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. त्या अनुषंगाने गुरुद्वारा रोड, बिजलीनगर, साईराज कॉलनी, शिवप्रसाद कॉलनी, गणेश कॉलनी, साईराम कॉलनी, चिंचवडेनगर, धनगरबाबा चौक, थेरगाव आणि पिंपळे गुरव येथे समितीच्या बैठका संपन्न झाल्या. प्राधिकरणाची कारवाई झालीच तर मोठ्या प्रमाणात तीव्र विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. बैठकीकरिता प्रत्येक विभागात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. समिती समन्वयक रेखा भोळे म्हणाल्या की, महिलांनी आता आंदोलनात सक्रिय होणे महत्त्वाचे आहे. हक्काच्या घरासाठी आपल्याला प्रशासनास धडा शिकवावाच लागेल. प्रशासनास आपल्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल.

यांनी केले नियोजन
समिती समन्वयक रजनी पाटील, सचिन काळभोर,धनाजी येळकर पाटील, राजेंद्र देवकर, राजेंद्र पवार, तानाजी जवळकर, अमर आदियाल, निलचंद्र निकम, वैशाली कदम, चंदा निवडुंग, नेहा चिघळीकर यांनी मार्गदर्शन केले. शहर बैठकांचे नियोजन राजेंद्र चिंचवडे, शिवाजी इबितदार, उमाकांत सोनवणे, रवी महाजन, संतोष चिघळीकर, किरण पाटील, भाऊसाहेब पाटील, गोपाळ बिरारी, आबा राजपूत, लक्ष्मण सुरसे काका, नारायण चिघळीकर, निकिता पाटील, सोनाली पाटील, मोतीलाल पाटील, माउली जगताप, प्रदीप पटेल, सुरेखा लांडगे, वैशाली भांगीरे, अमोल हेळवर, दत्ता गायकवाड, अमोल पाटील यांनी केले.