रिक्षांना बसविणार ‘क्यूआर कोड’

0

आरटीओने घेतला निर्णय

पुणे : विना परवाना व स्क्रॅप रिक्षा ओळखू येण्यासाठी रिक्षांना ‘क्यूआर कोड’ अर्थात क्विक रिस्पॉन्स कोड’ बसविण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हा निर्णय घेतला असून सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. हा क्यूआर कोड रिक्षा चालकाच्या सीटमागे लावण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकाला रिक्षा व रिक्षा चालकाची पूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांनाही कारवाई करताना परवानाधारक व विना परवानाधारक रिक्षा ओळखता येणार आहे.

बेकायदा रिक्षा चालवणारे ओळखता येतील

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात 5 ते 10 हजार स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर बेकायदा धावत असल्याची माहिती आहे. स्क्रॅप व विनापरवाना रिक्षांमुळे अधिकृत रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच अनेकदा रिक्षा चालकांकडून ग्राहकांशी वाद घालणे, मिटरप्रमाणे रिक्षा न नेणे, अरेरावी अशा घटना घडतात. या सर्वांना प्रतिबंध बसावा म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्यूआर कोड’ बसविण्याचा निर्णय घेतला. ज्या रिक्षा चालकाकडे अधिकृत परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन परवाना, बॅच असेल त्यालाच हा क्यूआर कोड’ देण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्यूआर कोड’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेकायदा रिक्षा व्यवसाय करणारे सहजासहजी ओळखू येतील. यामुळे वाहतूक पोलिसांनाही कारवाई करणे सोपे जाणार आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग