रिक्षाचालकांचे श्रमदान

0

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील अंजूर-अलिमघर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. हे खड्डे भरण्यासाठी माजी सरपंच शकुंतला पाटील, विजय पाटील याच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालक आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वत: श्रमदान करून खड्डे बुजविले. त्यामुळे अंजूर,अलिमघर, सुरई, मानकोली, भरोडी गावातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.