रिक्षाचालकांनो विद्यार्थ्यांची काळजी घ्या !

0

शिरपूर । येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत शालेय परिवहन मासिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.औपचारिक कार्यक्रम प्रसंगी रिक्षा वाहतूक संघाचे तालुका अध्यक्ष दत्तू माळी ,शहराध्यक्ष नितीन पाटील,माजी नगरसेवक दिलीप बोरसे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थी वाहतूक करतांना रिक्षा चालक व मालकांनी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

अशा केल्या सूचना
सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करत असताना रिक्षेत मर्यादीत विद्यार्थी संख्या असावी. पालक व शाळा यांचा दुवा म्हणजे रिक्षा चालक आहेत. रिक्षेवर विद्यार्थी वाहतूक करत असल्याचे लोगो,नाव ठळक अक्षरात लिहावे जेणेकरून अवजड वाहनधारक छोट्या वाहनांसाठी प्रथम जाण्यासाठी प्राधान्य देतील. रिक्षेत विदयार्थी यादी तसेच पालकांचे मोबाईल नंबर असलेली यादी असावी,प्रथमोपचार साहित्य रिक्षेत असणे बाबतचे मनोगत अविनाश राजपूत यांनी व्यक्त केले.सहविचार सभेचे सूत्रसंचालन व आभार महेंद्र माळी यांनी मानले.सभा यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ, संदीप पाटील,यशोदा पाटील,सतिष पाटील, सागर पवार यांनी परिश्रम घेतले.