रिक्षाचालकाकडे चोरी करणार्‍या अट्टल अल्पवयीन चोरट्याला मुद्देमालासह अटक

0

जळगाव: शहरातील डीमार्ट परिसरात रामनगर परिसरातील अमीन इकबाल पठाण वय 30 ह्या रिक्षाचालकाच्या घरुन 21 हजार 480 रुपयांचा ऐवज लाबविलयाची घटना 3 एप्रिल रोजी उघड झाली होती. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरा परिसरातील अट्टल अल्पवयीन चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन चोरट्यावर यापूर्वी अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

आईकडे रामेश्‍वर कॉलनीत गेले अन् चोरी
रामनगरात अमीन पठाण हे पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत. 30 मार्च रोजी ते कुटुंबासह रामेश्‍वर कॉलनीत राहणार्‍या आईकडे गेले होते. याठिकाणी सवर्व कुटुंबिय मुक्कामास थांबले. यादरम्यान 3 एप्रिल रोजी अमीन पठाण यांना त्यांच्या घरमालकांचा मुलगा युसूफ खान याने मोबाईलवरुन दरवाजा उघडा असून चोरी झाल्याची माहिती दिली. यानंतर पठाण घरी आले असता, सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला तर घरातील लोखंडी गोदरेजचे कपाट व कपाटाचे लॉकरमधून दागिणे लांबविले असल्याचे समोर आले. पहाणी केली असता 4 हजार 820 रुपये किमतीचे 107 ग्रॅमचे चांदीचे पैजण, 5 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम वजनाचे मुलांच्या पायातील चांदीचे फुलतोडे, 2 हजार 960 रुपये किमतीचे सोन्याचे दहा मणी, 2700 रुपये किमतीचे लहान मुलांचे चांदीचे दागिणे व 6 हजार रुपये किमतीचे 14 भार वजानचे चांदीचे ब्राॅसलेट असे एकूण 24 हजार 480 रुपयांचे ऐवज लांबविल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल झाला होता.

अल्पवयीन चोरट्यास अटक
तांबापुरा परिसरातील सराईत अल्पवयीन चोरट्याने हा मुद्देमाल लांबविल्याची गोपनीय माहिती एमआयडीचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या. पथकाने अल्पवयीन चोरट्यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील 24 हजार 480 रुपयांचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत.