जळगाव – शहरातील रोहनवाडी परिसरात रिक्षाचालकाचा खून करणार्या संशयिताला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने बुधवारी अटक केली. महेश आधार सोनवणे वय 30 रा. कानळदा रोड असे संशयिताचे नाव आहे . शहरातील रोहनवाडी येथे 8 नोव्हेंबर रोजी रिक्षाचालकाचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित घटना घडल्यापासून फरार होता. तो शहरात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे यांना मिळाली. त्यावर त्यांनी गुन्हे शोध पथकातील इम्रान सय्यद, अक्रम शेख, दीपक सोनवणे, गणेश साळवे, गौतम केदार, संजय भांडारकर यांना सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने त्याला बुधवारी अटक केली.