रिक्षाचालकाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव : शहरातील कांचननगरात राहणार्‍या एका 48 वर्षीय दारुड्या रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, रिक्षाचालकाच्या मृतदेहावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाम सिताराम पाटील हे कांचन नगरात भाड्याच्या खोलीत पत्नी अलकाबाई व राकेश, तेजस अशा दोन मुलांसोबत राहत होते. तर मोठी मुलगी भाग्यश्री हिचे लग्न झाले आहे. यातच त्यांना दारुचे व्यसन जडले होते.

‘काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाड्याची रिक्षाही चालविण्यास सुरूवात केली होती. मात्र दारुच्या व्यसनामुळे रिक्षा चालवणे कठीण असतांना त्याचे घरात कुटुंबीयांसोबत नेहमीच वाद व्हायचे. तर शाम पाटील हे कधीतरी घरी येत असे तर काही वेळेतस बाहेरच राहत होते. यामुळेच रविवारी रात्री कुटूंबिय घरात झापले असता शाम पाटील हे रात्री उशिराने घरी आले. यानंतर रात्री तिसर्‍या मजल्यावर बांधकाम सुरू असलेल्या खोलीत जावून दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास शेजारच्यांना शाम पाटील हे बांधकाम सुरू असलेल्या खालीत गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरडा करीत अलकबाई यांना घटनेची माहिती दिली. अलकाबाई व मुलांनी धाव घेत गळफास घेतल्याचे पाहताच एकच आक्रोश केला. शनिपेठ पोलीसांना गळफास घेतल्याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. पाटील यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.