पिंपरी-चिंचवड : रिक्षा थांब्यावर रिक्षाची तोडफोड करून नुकसान करणार्या तीन जणांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात हा प्रकार नुकताच घडला होता. या प्रकरणी वैभव मंगेश नवले (वय 18, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याने फिर्याद दिली आहे. शुभम हनुमंता आवटे (वय 20), संतोष चंदू जाधव (वय 19), आकाश तायप्पा पंद्री (वय 20, रा. तिघे रा. साईबाबानगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरडाओरड करत गोंधळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा वाल्हेकरवाडी येथील रिक्षा थांब्यावर मित्रांसमवेत गप्पा मारत बसला होता. त्या वेळी दुचाकीवर चारजण तेथे आले. ते रिक्षा थांब्यावर आरडाओरड करत गोंधळ घालत होते. त्या वेळी वैभवने त्या चौघांना येथे गोंधळ घालू नका, असे सांगितले. त्या कारणावरुन चिडून जाऊन चौघांनी रिक्षांची तोडफोड केली. रिक्षाच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, रिक्षा चालकाला दमदाटी केली. या प्रकारानंतर वैभव नवले याने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.