रिक्षात घरगुती गॅस भरतांना सिलेंडरचा स्फोट

0

जळगाव : रिक्षात घरगुती सिलेंडरने गॅस भरत असतांना सिलेंडरचा अचानक स्फोट होवून मोठा भडका झाल्याची घटना सोमवारी रात्री 7.15 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही. या घटनेत मात्र रिक्षा सह शेजारील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हरिविठ्ठल नगरातील रहिवासी नतीन सुभाष बारी हे त्यांच्या रिक्षा क्रमांक (एमएच.19.व्ही.6949) या रिक्षात सायंकाळच्या सुमारास घरगुती सिलेंडर मधुन घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात गॅस भरण्यासाठी आले. यावेळी रिक्षात गॅस भरत असतांना त्यांनी रिक्षाच्या सिलेंंडर मधील एअर काढण्यास सुरूवात केली. हा एअर अधिक प्रमाणात निघाल्याने जवळल तुळशी जवळ असलेल्या दिव्याला आस लागली यामुळे मोठा भडका झाला. ही घटना लक्षात येताच नितीन बारी व घराजवळील नागरीकांनी पळ काढला. काही क्षणातच तेथे ठेवलेल्या घरगुती सिलेंडने आग पकडत मोठा स्फोट झाला. घटनेची माहिती कळताच मनपाच्या अग्निशमन विभागाच्या बंबाला पाचारण करण्यात आले.

घटनास्थळी नागरीकांनी केली मदत
सिलेंडरचा स्फोट होत असल्याचे कळताच गॅस मेकॅनिकल शशिकांत मराठे यांनी परिसरातील नागरीकांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सर्वांना परीसर खाली करण्यास सांगीतले. यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही़ सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आग विझविण्यासाठी परिसरातील लक्ष्मण धनगर, महेंद्र मिस्त्री, गोरख महाराज, पिंटू बारी, यांच्यासह अनेकांनी मदत केली. या सिलेंंडरच्या स्फोटात शेजारील घरांचे मोठ्या प्रमणावर नुकसान झाले आहे. शेजारीच राहणार्‍या मराठे यांच्या घरातील फिश टँक, खिडकीचे काच, फ्रिज, व संसार उपयोगी सामानाचे नुकसान झाले आहे.