रिक्षात घरगुती गॅस भरतांना रिक्षा पेटली

0

चाळीसगाव ।घरगुती वापराची गॅस हंडी मधून ऑटो रिक्षा मध्ये गॅस भरत असतांना गॅस गळती होऊन गॅस हंडी व रिक्षा पेटल्याची घटना आज दि 16 मार्च 2017 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील फुले कॉलनी मध्ये घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे कडून इतर 2 गॅस हंड्या देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

गॅस गळतीत लागली अचानक आग
शहरातील फुले कॉलनीत सचिन बळीराम पवार वय 30 हा त्याची ऑटो रिक्षा क्र (एमएच 15, 1442) मध्ये रेग्युलेटर नळीला लावून घरगुती वापराचा गॅस रिक्षामध्ये 16 रोजी सकाळी भरत होता. गॅसची गळती होऊन अचानक आग लागल्याने या आगीत रिक्षा व सिलेंडर जळाले आहे. सदर माहिती पोलिसांना कळाल्यानंतर शहर पोलीस घटना स्थळावर जाऊन आरोपी सचिन बळीराम पवार यास ताब्यात घेऊन त्याच्या कडून इतर 2 घरगुती गॅस सिलेंडर दुसर्‍या वाहनामध्ये भरण्यासाठी ठेवलेले असतांना ताब्यात घेतले आहे. त्याचे विरोधात पीएसआय प्रश्नात दिवटे यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत करीत आहे.