पिंपरी-चिंचवड : रिक्षात बसण्याच्या वादातून रिक्षाचालक आणि त्याच्या मुलावर नऊ ते दहा जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने वार करून मारहाण करण्यात आली. ही घटना चिखली येथे शनिवारी (दि.23) रात्री सव्वानऊ वाजता नेवाळे वस्तीतील स्टार बेकरी समोर घडली. सिद्धेश उर्फ सोन्या मोरे, जुनेद नाईकवाडे, अनिकेत प्रकाश रणदिवे, आतीश उर्फ मुन्ना बलदेव कोरी, वाजीद शेख, आक्या बॉण्ड, आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर, वसीम हारुण शेख, विशाल खराते यांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नझीम करीमसाब शेख (वय 64 रा. तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.
डोक्यात, बरगडीवर वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख व त्यांचा मुलगा सद्दाम हे रिक्षाजवळ बोलत असताना अनिकेत व मन्नु उर्फ मन्या तेथे आला. त्याने रिक्षात बसण्यावरुन सद्दाम याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. थोड्याचवेळात अनिकेत याने त्याच्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. शेख बाप लोकांना धमकी देत सद्दाम यांच्या डोक्यात मागील बाजूस व शेख यांच्या डाव्या बरगडीवर वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपींवर बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी कऱणे असे गुन्हे दाखल केले असून सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड पुढील तपास करत आहेत.