जळगाव – पिंप्राळ्याकडून एमआयडीसीकडील सुप्रिम कॉलनीकडे जाणाऱ्या रिक्षाचालकाला पिंप्राळ्याजवळील मश्जित जवळ एक पर्स सापडलेली आढळलेली पर्स प्रामाणिकपणे पुन्हा महिलेला ती परत केली. रिक्षा चालकाचा हा प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतूक सुरू असून त्याला बक्षिस म्हणून 500 रूपयाचे बक्षिस दिले आहे. मिळालेली माहिती अशी की, सादीक शहा हाजी इकबाल रा. मास्टर कॉलनी हे एक रिक्षा चालक आहे. दररोज प्रमाणे आज सकाळी रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 6433) या वाहनाने पिंप्राळ्याहून प्रवाशी घेवून एमआयडीसीतील सुप्रिम कॉलनीकडे जात होते. पिंप्राळ्याजवळील मश्जित जवळ त्यांना एका महिलेची पर्स आढळली. या पर्समध्ये एक मोबाईल, घड्याळ आणि 500 रूपये रोख असे आढळून आले. पर्स सापडली तेव्हा आजूबाजूच्या विचारणा केल्यानंतरही कोणीही आढळून आले नाही. त्यांनी थेट रिक्षा शहर पोलीसात येवून पर्स सापडल्याची माहिती पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीसांनी पर्समध्ये असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून मिनाक्षी राजेश जाधव याचे असल्याचे समजले. मानाक्षी जाधव हे आपल्या पती राजेश जाधव यांच्यासह शहर पोलीसात येवून पर्सची खात्री करून घेतली. प्रामाणिकपणाने पर्स परत केल्याने रिक्षाचालकाचे कौतूक करत 500 रूपये बक्षिस म्हणून दिले.