रिक्षा चालकाची मुजोरी

0

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये रिक्षा चालकांची मुजोरी दिवसागणिक वाढत चालाली असून या बेशिस्त रिक्षा चालकवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे .या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेकडील मोहिंदर काबुल सिंग येथे रस्त्यात बेशिस्त पणे रिक्षा उभी करत वाहतुकीला अडथला निर्माण करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई सुरु असताना राहुल कारंडे व बाळा ठाकूर या दोन रिक्षा चालकांनी कारवाई करणाऱ्या पोलीस नाईक नामदेव हिमगिरे याच्याशी हुज्जत घालत त्याना ठोशा बुक्क्यांनी मारहान केल्याची घटना घडली आहे .दरम्यान काही दिवसांपूर्वी एका वाहन चालकाणे एका महिला ट्राफिक वार्डन ला मारहाण केली होती तर त्यापाठोपाठ कल्याण वाहतूक शाखेच्या कार्यालयात हि एका इसमाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली होती त्यापाठोपाठ पुन्हा हि घटना घडल्याने अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे .

कल्याण पश्चिमेकडील मोहिंदर काबुल सिंग येथे वाहतूक शाखेचे पोलीस नाईक नामदेव हिमगिरे व ट्राफिक वार्डन अक्षय उगले हे काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावर बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करत वाहतुकीला अडथला ठरणाऱ्या रिक्सा चालकाविरोधात कारवाई करत होते यावेळी राहुल कारंडे या रिक्षा चालकवर कारवाई करत त्याची पावती बनवत असतान राहुल याने पोलीस नाईक नामदेव हिमगिरे बरोबर हुज्जत घालयास सुरुवात केली .त्यानंतर त्याने हिमगिरे ची कोलर पकडून त्याला ठोशा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात राहुल कारंडे व बाळा ठाकूर या दोन रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या राहुल करंडे याला अटक करण्यात आली आहे .