वाहतूक नियमांचे उल्लंघण भोवले ; 70 वाहनधारकांवर कारवाईची टाच
फैजपूर- रीक्षा बाजूला काढण्याचा सांगितल्याचा राग आल्याने रीक्षा चालकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना 1 रोजी फैजपूरच्या बसस्थानकजवळ घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रविवारी अवैध प्रवासी वाहतुकीविरुध्द धडक मोहीम हाती घेऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या अशा 70 वाहनांवर कारवाई करून दि 8 सप्टेंबर रोजी यावल येथे लोकन्यायालयात हजर राहण्याच्या सूचना पोलिसांनी रीक्षा चालकांना दिल्या आहे. या कारवाईने अवैद्य प्रवासी वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांच्या मोहिमेनंतर अवैध वाहतूकदारांमध्ये खळबळ
फैजपूर शहरातील बसस्थानक ते सुभाष चौक पर्यंत अंक्लेशवर – बुर्हाणपूर महामार्गावरील बसस्थानक, छत्री चौक, सुभाष चौक या प्रमुख ठिकाणी प्रवासी वाहतुकीने डोके वर काढल्याने सर्वसामान्य नागरीकांसह नियमित वाहतुकीची डोकेदुखी झाली आहे. रीक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी शनिवारी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र महाजन व पोलीस नाईक उमेश सानप यांनी प्रवासी वाहतूक करणार्या रीक्षा चालक शाहरुख शेख कलीम याला बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रीक्षा बाजूला काढण्याचा सांगितल्याचा राग आल्याने या रीक्षाचालकाने पोलीस महेंद्र पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर 2 रोजी फैजपूर पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीविरुध्द कठोर पावले उचलली. या मोहिमेत धनाजी नाना माहाविद्यालय , पिंपरुड फाटा या ठिकाणी नाकाबंदी व सुभाष चौक, छत्री चौक, बसस्थानक या ठिकाणी बेशिस्त वाहतूक, बेशिस्त रीक्षाचालक, विना परमीट, विना लायसन्स, विना कागदपत्र, विना ड्रेस रीक्षा चालकांविरुध्द वाहतूक नियमनासाठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग व ए पी आय दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी व पाच पोलिस कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले आहे. रविवारची कारवाई पोलिस उपनिरीक्षक जिजाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे, हवालदार ईकबाल सय्यद, कॉन्स्टेबल अनिल महाजन, चेतन महाजन, महेश वंजारी, उमेश सानप, दिनेश भोई, उमेश चौधरी यांनी केली.