रिक्षा ट्रकच्या अपघातात तरूण गंभीर

0

जळगाव। ईच्छादेवी चौफुलीजवळ रिक्षाला भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने समोरून धकड दिली. यात रिक्षातील प्रवासी तरूण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी ट्रक व चालक तसेच रिक्षाही ताब्यात घेतली आहे. तर चालकाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली .

तरूणाची प्रकृती चिंताजनक; अतिदक्षता विभागात दाखल
सोमवारी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास एमएच.19.झेड.4295 हा ट्रक ईच्छादेवीकडून सावद्याकडे जात होता. यात दरम्यान, प्रवासी रिक्षा (क्रं.एमएच.19.व्ही.8895) ही मेहरूण येथून प्रवासी घेवून सिंधी कॉलनीकडे जात होता. रिक्षा ईच्छादेवी चौफुलीजवळ येताच सावद्याकडे जाणार्‍या ट्रकने रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. यात रिक्षा एका बाजूला दाबली जावून त्यातील प्रवासी तरूण रविंद्र राजाराम जोशी (वय-27 रा. संजयगांधी नगर, सिंधी कॉलनी) हा गंभीर जखमी होवून रस्त्यावर फेकला गेला. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत गंभीर जखमी रविंद्र याला रिक्षातून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तर नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून ठेवले होते. रूग्णालयात नागरिकांसह तरूणाच्या नातेवाईकांनी गर्दी करत गोंधळ घातला. तर ट्रक चालकास धक्काबुक्कीही केली. रूग्णालयातील पोलिस चौकीतील पोलिस कर्मचार्‍याने ट्रकचालकास चौकीत बसवून ठेवल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेबाबत कळविले. एमआयडीसी पोलिसांनी लागलीच ईच्छादेवी चौफुली गाठत ट्रक ताब्यात घेतला. तर चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.