रिक्षा धडकेत एक जण जखमी

0

कल्याण । कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली प्रभुराम नगर दशरथ कुटीरमध्ये राहणारे नामदेव लांडगे हे शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्‍चिमेकडील बैल बाजार परिसरातील कल्पतरू हॉस्पिटल समोरून जात असताना अचानक पाठीमागून येणार्‍या भरधाव वेगाने रिक्षाने त्यांना धडक दिली. या अपघातात नामदेव जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी उशिराने लांडगे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.