रिक्षा परमिटसाठी तीन हजार अर्ज दाखल

0

घणसोली : नवी मुंबई परिसरातील रिक्षा परमिटसाठी आतापर्यत तीन हजाराच्या आसपास अर्ज दाखल झाले आहे. सहाशेच्या वर रिक्षा परमिटची मागणी करणार्‍यांना मोबाईलवर संदेश पाठविले असल्याची माहिती वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यातयाचे सहाययक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली. दरम्यान, सर्वच रिक्षा चालकांना अर्ज दिल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून टप्प्याटप्प्याने परमिट मिळतील असेही परिवहन अधिकारी सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ज्याला मागेल त्याला रिक्षा परमिट अश्या प्रकारचा आदेश काढला होता. त्या आदेश नुसार ज्यांना आजतागायत लॉटरी पद्धतीने परमिट मिळाले नव्हते त्यांनी आता परमिटसाठी अर्ज कार्यालयात दाखल केले आहेत.

परमिटसाठी रिक्षा परवाना व बॅच आवश्यक
सध्या वाशी कार्यालयात परमिटसाठी इच्छुक असणार्‍या अर्जदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परमिटसाठी रिक्षा परवाना व बॅच हे महत्वाची कागद पत्र महत्वाची आहेत. परमिट साठी महत्वाचा असणारा पुरावा पोलीस नाहरकत पत्र देण्यासाठी सहा महिन्याचा अवधी मिळाल्याने रिक्षा चालक आनंदी झाले आहेत. ज्या रिक्षा चालकांनी आज पर्यंत अनेकदा परमिट साठी लॉटरी पद्धतीने अर्ज केले होते व त्यांना मिळाला नाही त्यांचे आता स्वप्न पूर्ण होणार असल्याने अनेक रिक्षा चालकांनी आनंद व्यक्त केले आहे.