रिचार्ज स्कीम बारळल्यानेे वीज ग्राहकांसमोर संकट

0

अलिबाग। राज्य विज वितरण मंडळाने आणलेली रिचार्ज स्कीम बारळल्याने रायगड जिल्ह्यातील शेकडो विज ग्राहकांसमोर नवे संकट उभे राहीले आहे. रिचार्ज मिटरचे एका कंपनीशी करार करण्यात आला होता. मात्र वेळीच त्याचे अपडेशन झाले नसल्याने सेवा बारगळली गेली असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

मिटर रिचार्ज करा लाईट वापरा अशी ही स्कीम होती. यामध्ये शेकडो ग्राहकांनी सहभाग घेतला मात्र सध्या घेण्यात आलेले रिचार्ज मिटर चालतच नसल्याने विज ग्राहकांना आपले किती पैसे शिल्लक आहेत याचा ताळमेळ लागत नाही. पैसे संपले तर विज पुरवठा बंद होणार, रिचार्ज करायचा तर मिटर चाळत नाही. अशा गोंधळामध्ये ग्राहक सापजले असून विज ग्राहकांनी मिटर बदलून मागितले तर रिचार्ज ची स्कीम बंद झाली आहे.