रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर; आरबीआयकडून मोठ्या घोषणा

0

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने आज गुरुवारी आपले वार्षिक पतधोरण जाहीर केले आहे. कोरोनामुळे सर्वच घटकावर आर्थिक परिणाम झाले असल्याने रिझर्व्ह बँकेच्या घोषणेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. दरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सकारात्मक धोरण जाहीर केले आहे. रिव्हर्स रेपो आणि रेपो दर जैसे थे असल्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. त्यानंतर त्यांनी अनेक घोषणा केला. कोरोनामुळे ‘इएमआय’साठी सवलत देण्यात आलेली आहे. ती सवलत कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२०२०-२१ या वर्षात जीडीपीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. आर्थिक क्षेत्रातील नकारात्मक वातावरणामुळे यंदा जीडीपीत वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे गव्हर्नर यांनी सांगितले.

कोरोनासारख्या महामारीत आर्थिकदृष्ट्या मोठे निर्णय घेणारी आरबीआय ही जगातील एकमेव बँक असेल असा दावाही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केला आहे.