रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि मिलाप जव्हेरी पुन्हा एकत्र

0

मुंबई : मिलाप जव्हेरी यांच्या दिग्दर्शनाखाली रितेश देशमुख, सिध्दार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मरजावां’ हा चित्रपट बनणार आहे. मर हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१९ रोजी रिलीज होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तारा सुतारिया हिने ‘स्टुडंट्स ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

”एमे प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘मरजावां’ची निर्मिती केली जाईल. या चित्रपटात भरपूर अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्स पाहायला मिळणार आहे. ‘एक विलेन’ चित्रपटानंतर रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि मिलाप जव्हेरी पुन्हा एकत्र काम करीत आहेत.