जळगाव । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव महानगर कार्यध्यक्षपदी दैनिक पुण्यप्रतापचे पत्रकार रितेश माळी यांची जळगाव महानगर कार्यध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी नियुक्ती केली आहे.
पत्रकार रितेश माळी यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देवुन संघाच्या कार्यालयात सत्कार करण्यात यावेळी जिल्हा कार्यध्यक्ष भरतदादा काळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय तांबे,जिल्हा महासचिव सुनिल भोळे उपस्थीत होते. रितेश माळी यांच्या निवडी बद्दल विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष नितिन पाटील, महानगर अध्यक्ष अजय वाघ,जिल्हा उपाध्यक्ष भुषण महाजन यांनी अभिनंदन केले आहे.