जळगाव : तालुक्यातील रिधूर गावी रस्त्याचे काम सुरु आहे. त्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून टँकरने पाणी नेल्याच्या कारणावरून वाद होवून हाणामारी झाल्याची घटना 29 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी तालुका पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिधूर गाव शिव रस्याचे काम सुरु आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी नामदेव उर्फे पिंटु शालिग्राम पाटील याने ठेकेदाराच्या टँकरने ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून रस्त्यांच्या कामांसाठी पाणी नेले होते.
कुर्हाडीने केली मारहाण
पाणी नेल्याचा राग येवून ग्रामपंचायत सदस्य पद्माकर भागवत पाटील, शिवदास कोळी, केदार साहेबराव कोळी, शुभम दिलीप सोनवणे, सोनु तुषा कोळी, शरद पुरुषोत्तम कोळी,गंगाधर विठ्ठल पाटील, सागर अशोक कोळी, विक्की नामदेव कोळी, समाधान पुंडलिक सोनवणे,पुंडलिक तुकाराम कोळी, प्रभाकर पाटील रा. सर्व रिधून यांनी नामदेव पाटील, शरद पुंडलिक पाटील व सुभाष दोधु पाटील या तिघांना लोखंडी कुर्हाड, लाठया काठयांनी मारहाण केली.
11 संशयितांना अटक; कोठडीत रवानगी
पद्माकर भागवत पाटील, शिवदास कोळी, केदार साहेबराव कोळी, शुभम दिलीप सोनवणे, सोनु तुषा कोळी, शरद पुरुषोत्तम कोळी, गंगाधर विठ्ठल पाटील, सागर अशोक कोळी, विक्की नामदेव कोळी, समाधान पुंडलिक सोनवणे, पुंडलिक तुकाराम कोळी यांच्यासह अल्पवयीन मुलांसह अटक
करण्यात आली आहे. या अकरा जणांना न्या. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विवाहितेचा विनयभंग
रिधूर येथील मारहाणीच्या घटनेदरम्यान मागील किरकोळ वादावरून तिघांनी विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना रात्री 9.15 वाजेच्या सुमारास घडली. सागर मुकेश कोळी, दिपक कोळी,विकास कोळी यांनी मागील वादातून विवाहितेच्या घरात प्रवेश करून विवाहितेचा विनयभंग केला. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून सागर कोळी, दिपक कोळी, विकास कोळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यातच पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील व प्रफुल्ल धांडे यांनी तिघा संशयितांचा शोध घेवून त्यांना जैनाबाद येथून अटक केली आहे.
घटनास्थळी डीवायएसपीची भेट
मारहाणीच्या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याघटनेची माहिती कळताच डीवायएसपी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील, पीएसआय. आवारी, पोकॉ. उमेश भांडारकर, जितु पाटील, विजय दुसाने, धर्मेद्र ठाकूर, प्रफुल्ल धांडे यांच्यासह पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून हस्तक्षेप करत वाद शांत केला. दरम्यान या प्रकरणी नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुध्द गुरन.123/16 भादवी कलम 307,143,144,148,149,324,325,504,506, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील करीत आहे. पोलिसांनी रात्रीच अटक सत्र राबवून 11 संशयितांना अटक केली आहे.